Jawan Movie Preview | जवानच्या प्रिव्ह्युमध्ये दिसणारा शाहरुख खानच्या मस्तकावरचा हा टॅटू नक्की आहे तरी काय?

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या बॉलीवुडच्या जवान (Jawan Movie Preview) चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. किंग खानच्या (Bollywood King Khan) या ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यु काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ‘जवान’ चित्रपटाच्या या प्रिव्हयु (Jawan Movie Preview) नंतर सोशल मीडियावर सर्वत्र फक्त शाहरुख खानची (Shah Rukh Khan) व जवान चित्रपटाची चर्चा आहे. यामध्ये दाखवण्यात आलेली जबरदस्त ॲक्शन आणि शाहरुखची वेगवेगळी रुपं चाहत्यांना आवडली असून शाहरुखच्या भूमिकेबाबत चाहते उत्सुक आहेत. दरम्यान त्याचा प्रिव्ह्यु मधील टक्कल असलेल्या लूकमध्ये त्याचा एक टॅटू (Shah Rukh Khan Tattoo) दिसत आहे. सोशल मीडियावर शाहरुखच्या या टॅटुबद्दल सर्वांना प्रश्न पडला आहे. शाहरुख खानच्या डोक्यावर डाव्या बाजूला नक्की टॅटू कशाचा आहे असा सवाल सर्वांना पडला आहे.

 

 

 

जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू (Jawan Movie Preview) रिलीज झाल्यापासून शाहरुखच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली कुमार (Atlee Kumar) यांनी केले. चित्रपट हा भव्य दिव्य असणार आहे याची प्रचिती प्रिव्ह्यू (Jawan Teaser Out) बघून येत आहे. यामधील एक बारीक गोष्ट चाहत्यांनी हेरली आहे ती म्हणजे किंग खानचा टॅटू.( King Khan Tattoo) यामध्ये अनेक अवतारांमध्ये शाहरुखचा एक गंजा असलेला अर्थात टक्कल असलेला लूक आहे. यामध्ये त्याच्या डोक्यावर डाव्या बाजूला अक्षरात लिहिलेला टॅटू आहे. तो संस्कृत भाषेत आहे. शाहरुखच्य़ा या टॅटूमध्ये ‘मॉं जगत जननी’ असे लिहिलेले आहे. याचा अर्थ असा पूर्ण जगाची आई असा होतो. एक ट्रेड विश्लेषकाने ही बाब समोर आणली आहे. सोशल मीडियावर आता शाहरुख खानच्या या टॅटूची चर्चा होत आहे. त्याचा टॅटूचा फोटो देखील व्हायरल होत आहे.

 

अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री नयनतारा (Nayanthara)
यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जवान’ (Jawan) चित्रपट जबरदस्त ॲक्शन,
हाट टेक ड्रामा व सस्पेंसने भरपूर असणार आहे
. चित्रपटामध्ये किंग खान व नयनताराचा रोमांस (SRK And Nayanthara Romance)
देखील बघायला मिळणार असल्याचे नयनताराचा पती विग्नेश शिवन (Vignesh Sivan) याने सांगितले आहे.
याचबरोबर चित्रपटामध्ये विजय सेतुपति (Vijay Sethupathi,),
प्रियमणी (Priyamani) हे कलाकार झळकणार आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे.
येत्या 7 सप्टेंबर ला बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित (Jawan Release Date) होणार आहे.

 

Web Title : Jawan Movie Preview | shah rukh khan head tattoo in bald look of jawan prevue decoded find out what it is

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा