Pune News : जिल्ह्यातील जवानाला अरुणाचल प्रदेशात आलं विरमरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा धोका असताना भारतीय जवान सीमेवर शत्रूशी मुकाबला करीत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील एका जवानाला विरमरण आल्याचे वृत्त समोर आले आहे. संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय-30) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात विरमरण आले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

देशभरात नववर्षाचे स्वागत उत्साहत केले जात असताना शेजारील पाकिस्तानकडून कुरापती सुरुच होत्या. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. मात्र असे असातनाही भारतीय सैन्याने पुरेपुर प्रतिकार करून शत्रूला परतवून लावले. त्यातच संभाजी राळे या जवानाला अरुणाचल प्रदेशात वीरमरण आले.

दरम्यान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी नुकताच अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी वास्तविक नियंत्रण रेषेवरील लष्करी तळांची पाहणी केली. भारतीय सैनिकांच्या निग्राहाबाबत मी समाधानी आहे. वेळ आली तर कोणतंही आव्हान परतवण्यास आपण सक्षम असल्याचे बिपिन रावत यांनी म्हटले होते.