#Video : प्रेग्नंट पत्नीचे पाय दाबताना ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस माही विज आजकाल तिच्या प्रेग्नंसीमुळे खूप एन्जॉय करत आहे. ती सतत फोटो क्लिक करताना दिसत आहे. ती प्रेग्नंट असल्याने तिचा पती जय भानुशाली देखील तिची खूप काळजी घेताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे ज्यात जय भानुशाली आपली प्रेग्नंट पत्नी माहीला फुट मसाज देताना दिसत आहे. हा व्हिडीओ माहीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. यानंतर हा व्हिडीओ अनेक तिच्या फॅन पेजवर शेअर झालेला दिसून आला.

हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये माही म्हणते की, “देव असा पती सर्वांनाच देवो.” हे स्पष्ट आहे की, माही जयच्या केअरींग स्वभावासाठी त्याची आभारी आहे. जय माहीला खुश ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. सध्या या स्टारकपलचा हा व्हिडीओ सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी जयचे याबद्दल कौतुकही केले आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंटही केली आहे. त्याचा केअरींग अंदाज सर्वांनाच आवडला आहे.

माही नुकतीच आमना शरीफच्या ईद पार्टीत बेबी बंप फ्लॉंट करताना दिसून आली होती. यावेळी माही आपल्या सेकंड ट्रिमेस्टर मध्ये आहे. ती तिची प्रेग्नंसी फेज खूप एन्जॉय करत आहे. तिचे बेबी बंपमधील अनेक फोटो याआधीही सोशलवर व्हायरल झाले आहेत. माही आणि जयच्या चाहत्यांनी त्यांचा हा व्हिडीओ लाईक केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन