काजोलची ‘ही’ गोष्ट खूप ‘इरिटेट’ करते’, पती अजय देवगनचा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अजय देवगन आणि काजोल हे बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक आहे. दोघांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे आणि दोघांमध्ये आजही खूप प्रेम दिसत आहे. दोघांनीही एकमेकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी स्विकार आहेत. अशात अजयनं काजोलची कोणती गोष्ट त्याला आवडत नाही याचा खुलासा केला आहे.

अजय देवगन सांगतो की, काजोलचं प्रमाणापेक्षा जास्त बोलणं त्याला खूप इरिटेट करतं. परंतु जेव्हा काजोल जास्त बोलत नाही तेव्हा अजय ते मिस करतो असंही त्यानी म्हटलं आहे. अजय म्हणतो, “ती सेटवर खूप बोलत असते. जर तुम्ही तिला कॉन्सन्ट्रेट करायला सांगितलं तर त्यावेळी ती काहीतरी वेगळंच करत असेल. मी तिच्या जास्त बोलण्याला घेऊन तक्रार करत असतो. परंतु जेव्हा ती गप्प असते तेव्हा मी तिला विचारत असतो, काय झालं. त्यामुळे मला हे काहीच बदलायचं नाही.”

अजय पुढे म्हणतो, “ती चांगली कलाकार आहे हे सर्वांना माहिती आहे. अ‍ॅक्टर म्हणून तिच्या सोबत काम करताना मला नेहमीच मजा आली आहे. ती माझी पत्नी आहे आणि ती मला जास्त कंफर्टेबल होऊ देते.”

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर अजय देवगन लवकरच तानाजी या आगामी सिनेमात दिसणार आहे. अजय तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात काजोलही त्याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. काजोलनं सिनेमातही अजयच्या म्हणजेच तानाजींच्या पत्नीचा रोल साकारला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !