जय महाराष्ट्र म्हणत नवनियुक्त कप्तानाने साधला संवाद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
प्रो-कबड्डी लीगच्या सिझन सहासाठी पुणेरी पलटणच्या कप्तानपदी  गिरीश एर्नाकची  निवड करण्यात आली आहे. पुणेरी पलटनच्या नवीन जर्सीच्या अनावर प्रसंगी ही  घोषणा करण्यात आली.  गिरीश हा सिझन पाच पासून पुणेरी पलटनचा अविभाज्य घटक राहिलेला आहे .आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा गिरीश हा मूळचा पुण्याचा आहे . पुणेरी पलटनच्या नवीन जर्सीच्या अनावर प्रसंगी नवनियुक्त कप्तान गिरीश एर्नाक ,संघाचे मुख्य  प्रशिक्षक अशन कुमार , पुणेरी पलटणचे  मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल , किर्लोस्कर ब्रॅदर्सचे इंडिया बिझनेस हेड अनुराग व्होरा , फोर्स मोटर्सचे व्यवस्थपकीय संचालक प्रसन फिरोदिया उपस्थित होते .
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd6ff4b6-c177-11e8-b19e-957eae3d1b6a’]
या प्रसंगी पुणेरी पलटणचे  मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश  कांडपाल म्हणाले की , “सहाव्या  सिझनमध्ये  गिरीश संघाच्या कप्तान पदाची धुरा सांभाळेल. गिरीशच्या नेतृत्वाखाली सिझन सहामध्ये  संघाची कामगिरी नक्की उंचावेल. “
पुणेरी पलटणचा नवनियुक्त संघनायक गिरीश  एर्नाकने जय महाराष्ट्र म्हणत संवाद साधला . या प्रसंगी तो म्हणाला  की , “संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यामुळे तसेच माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मला कृतज्ञ वाटत आहे. आमचा संघ शारीरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम असून जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. संघ म्हणून आमची कामगिरी नक्कीच शानदार असेल. अशन सरांच्या मार्गदर्शनाखाली या सीझनमध्ये नक्कीच आम्ही ट्रॉफी जिंकू .”
[amazon_link asins=’B016BVZOBQ,B016BVZCEK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfe7bcfb-c177-11e8-8bd4-87d742897a64′]
पुणेरी पलटण हा कबड्डी प्रो-लीग मध्ये सातत्याने सहभागी होणार संघ आहे . गेली तीन  सीझनमध्ये आघाडीच्या चार संघामध्ये राहिला आहे .
प्रो-कबड्डी लीग सिझन सहा ७ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. पुणेरी पलटणची  पहिली स्पर्धा ऑक्टोबर ७ रोजी चेन्नईमध्ये यू -मुंबा विरुद्ध होणार आहे . पुणेरी पलटणच्या पुण्यातील स्पर्धा १८ ते २४ ऑक्टोबर पर्यंत स्पर्धा चालतील .