सध्या ‘लांब-लांब’ असलेल्या जया बच्चन आणि रेखा ऐकेकाळी होत्या ‘मैत्रीणी’, ‘या’ मुळं ‘कळलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म इंडस्ट्रीत जर जया बच्चन आणि रेखा एकत्र कोठे दिसल्या तर सर्वात मोठी बातमी होते. आताही असंच काहीसं झालं आहे. रेखा आणि जया बच्चन यांचा एकत्र असणारा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंस्टाग्रामवरील एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

जया आणि रेखा यांचा हा फोटो त्या काळचा आहे जेव्हा त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. जया आणि रेखा दोघीही या फोटोत खूप सुंदर दिसत आहेत. दोघीही साडीच्या लुकमध्ये दिसत आहे. जयाने केसात गजरा माळला आहे आणि मेकअप केल्याचेही दिसत आहे. रेखाने डीप आय लायनर लावले आहे.

फोटो पाहून असे वाटत आहे की, त्यावेळी दोघींचीही चांगली मैत्री होती. हा फोटो एखाद्या इव्हेंटमधला आहे असे दिसत आहे. चाहत्यांनाही जया आणि रेखा यांचा हा फोटो खूप आवडला आहे. चाहते म्हणत आहेत आहे की, हा त्या काळचा फोटो आहे जेव्हा रेखा, जयासाठी धोका नव्हती. रेखाच्या आयुष्यात अमिताभ यांची एन्ट्री झाल्यानंतर जया आणि रेखा यांचं नातं खराब झालं.

रेखा यांनी सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये अमिताभ आणि त्यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं. त्यांनी त्यांचे नाते स्विकार केले होते. रेखाने म्हटले होते की, “मी त्यांच्यावर प्रेम करते. कोणी आमच्याबद्दल काय विचार करतं त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मी अमिताभवर माझ्यासाठी प्रेम करते. कोणाला दाखवण्यासाठी नाही.”

जया आणि रेखा आजही एकमेकींना टाळतात. जयाने यावर कधीच भाष्य केलं नाही. अमिताभ, जयाआणि रेखा यांनी केवळ एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. ‘सिलसिला’ असं या सिनेमाचं नाव आहे. यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अमिताभ, रेखा आणि जयादेखील आहे. 1981 रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like