जया बच्चननं मुलगी श्वेता सोबत केला ‘पल्लो लटके’ गाण्यावर डान्स ! व्हिडीओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जया बच्चन (Jaya Bachchan) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपले काही फोटो आणि व्हिडीओ देखील ते सोशलवर शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात जया बच्चन त्यांची लेक श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan-Nanda) सोबत डान्स करताना दिसत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार जया आणि श्वेता यांचा हा व्हिडीओ जुनाच आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध फॅशन डिझायनर संदीप खोसलाची पुतणी सौदामिनीच्या रिसेप्शनच्या पार्टीचा आहे. त्यांचं लग्न 2018 मध्ये झालं होतं.

व्हिडीओत दिसत आहे की, जया आणि त्यांची लेक श्वेता पल्लो लटके गाण्यावर काही स्टेप्स करत आहेत. सुरुवातीला डान्स करताना जया काहीशा लाजताना दिसत आहेत. परंतु मास्टरजी यांच्या सांगण्यावरून त्या पुन्हा डान्स करतान दिसतात. दोघींना डान्स करताना पाहून बाकी लोक खूपच एक्सायटेड झाल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ कोरियोग्राफर राजेंद्र सिंहनं त्याच्या इंस्टावरून शेअर केला आहे. राजेंद्र सिंहलाच लोक प्रेमानं मास्टरजी म्हणून हाक मारतात. मास्टरजी लग्नाचे डान्स कोरियोग्राफ करत असतात.

जया आणि श्वेता यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.