बलात्कारांच्या घटनांमुळे संतापल्या जया बच्चन, पत्रकारास म्हणाल्या – ‘कदाचित तुम्हाला पकडून मारेल’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन देशातील महिलांवरील गुन्हेगारीबद्दल चिंतीत आणि संतप्त झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, आता मला असं वाटतय की रागाच्या भरात मी तुम्हाला पकडून मारू शकते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे आरोपींनी बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याच्या प्रकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या की, ‘ जे घडले … ते खूप घाणेरडे होते. चित्रकूट पोलिस ठाण्याअंतर्गत जे घडले ते आम्ही संसदेत उपस्थित करू शकत नाही. त्यावर बोलू शकत नाही. काय घडत आहे हे? जर आम्ही संसदेत खूप कठोर शब्द वापरले तर आपण असे बोलू नका असे सांगितले जाते. त्यामुळे मला असं वाटतंय मी रागाच्या भरात मी माझ्या समोर असणाऱ्या लोकांना मारील. ‘

उत्तर प्रदेशमध्ये कोणीही सुरक्षित नाही –

उत्तर प्रदेशातील महिलांवरील गुन्ह्याबाबत त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात सुरक्षा कोठे आहे ? कोणीही सुरक्षित नाही. जर मी आता तुम्हाला यूपीच्या घटना सांगितल्या तर तुम्हाला धक्का बसेल.

गुरुवारी सकाळी उन्नावमधील एका घटनेने लोकांना हैराण केले. येथे बलात्कार पीडितेला आरोपीने जिवंत जाळले. हैदराबाद घटनेनंतर देशही असाच संतापला आहे.