Jaya Bachchan | जया बच्चन यांचा नातीला अजब सल्ला, ‘लग्न न करताही तू आई बनू शकतेस’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. पैपराजी जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा फोटो काढताना पडता पडता वाचला. हे पाहून जया बच्चन तू एकदा नाही तर अजून चार वेळा पडायला पाहिजे असे म्हणाल्या. जया बच्चनचे हे बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना लोकांकडून टार्गेट केले जात आहे.

 

मात्र यावेळी जया बच्चन (Jaya Bachchan) या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिच्यावर भाष्य केले. जया बच्चन म्हणाल्या की, कोणतेही नाते चालवण्यासाठी शारीरिक आकर्षण आवश्यक असते. नव्याच्या पॉडकास्ट ‘व्हाट द हेल नव्या’ (What the hell Navya) या शोमध्ये बोलताना अनेक विषयांवर जया बच्चन यांनी भाष्य केले.

 

काय म्हणाल्या जया बच्चन
आमच्या काळात आम्ही काही गोष्टी करून पाहू शकत नव्हतो. फक्त प्रेम आणि समायोजनावर नाते नक्कीच टिकू शकत नाही.
नंदाने लग्नाशिवाय जर बाळाला जन्म दिला तर मला काहीच अडचण नाही आहे. लोकांना कदाचित माझे हे बोलणे पटणार नाही परंतू फिजिकल अट्रक्शनदेखील (Physical Attraction) खूप महत्वाचे आहे.
तसेच शारीरिक संबंधाशिवाय नाते फार काळ टिकू शकत नाही.
यामुळे जर उद्या नव्याने लग्नाच्या अगोदर बाळाला जन्म दिला तर मला काहीच प्राॅब्लेम नसणार आहे.
जया बच्चन यांच्या या वक्तव्याने अनेकांनी आर्श्चय व्यक्त केले आहे.

 

Web Title :- Jaya Bachchan | jaya bachchan made a big statement about her granddaughter navya naveli nanda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

Nitin Gadkari | ‘देशात ई-महामार्ग आणि ई-ट्रक आणण्याचा देखील आमचा संकल्प’ – नितीन गडकरी

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी