‘लॉकडाऊन’मुळं दिल्लीत अडकल्या जया बच्चन ! वाढदिवसाच्या दिवशी ‘अभिषेक-श्वेता’ इमोशनल

पोलीसनामा ऑनलाईन :दिग्गज अभिनेत्री ते खासदार बनलेल्या जया बच्चन आज(दि 9 एप्रिल 2020) आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या कोरोनामुळं सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये त्या दिल्लीतच अकडल्या आहेत. त्यांचं कुटुंब मात्र त्यांना खूप मिस करत आहे. त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेक बच्चन जया यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आपल्या भावना सोशलवरून शेअर करत अभिषेकनं त्यांना बर्थ डे विश केलं आहे. श्वेतानंही त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहेत ज्यात श्वेता आणि अभिषेक मुलं आहेत आणि जया यंग दिसत आहेत. हा फोटो शेअर करत श्वेतानंही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिषेकनं आई जया बच्चनचा फोटो शेअर करत लिहिलं की, “प्रत्येक मुलगा तुम्हाला सांगेल की, त्याचा फेवरेट शब्द आई असतो. हॅप्पी बर्थ डे आई. वास्तविक पाहता तुम्ही दिल्लीत आहात लॉकडाऊन लागू आहे आणि आम्ही सगळे मुंबईत. तुम्हाला माहितीये ना आम्ही तुम्हाला मिस करतोय. तुम्ही हृदयात राहता. आय लव्ह यु.”

एक जुना फोटो शेअर करताना श्वेतानं लिहिलं की, “मी तुमचं हृदय माझ्यासोबत घेऊन चालत असते. तुम्ही माझ्या हृदयातच राहता. मी कधीच याशिवाय नसते. मी जिथे जाते तिथे तुम्ही माझ्या सोबत असता. हॅप्पी बर्थ डे आई. आय लव्ह यू.”

जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. 1963 साली आलेला सत्यजीत रे यांचा महानगर हा त्यांचा डेब्यू सिनेमा आहे. जया यांनी अनेक फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहेत.

You might also like