अश्लील शेरेबाजीवरून जयाप्रदा भडकल्या म्हणाल्या…

लखनौ : वृत्तसंस्था – समाजवादी पार्टीचे नेते फिरोज खान यांनी भाजप नेत्या जया प्रदा यांच्यावर केलेल्या अश्लील शेरेबाजीरुन जया प्रदा भडकल्या असून, त्यांनी सपा नेत्याला खडे बोल सुनावले आहेत. सपावाल्यांचे हे असलेच संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा केली जाऊ शकत नाही. अशा शब्दात त्यांनी फिरोज खान यांना सुनावले.

जया प्रदा या भाजपकडून रामपूर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर याच मतदारसंघातून सपा नेते आझम खान देखील निवडणूक लढवत आहेत. याबाबत बोलताना फिरोज खान म्हणाले होते की जया प्रदा या त्यांच्या ठुमक्यांनी रामपूरच्या संध्याकाळ रंगीन करतील.

जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना रामपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर याच मतदारसंघातून सपा नेते आझम खान हे देखील निवडणूक लढवत आहेत. फिरोज खान हे आझम खान यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी जयाप्रदा यांच्याविषयी अश्लील शेरेबाजी केली होती.

You might also like