अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची जया साहाची कबुली

पोलिसनामा ऑनलाईन – क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीमध्ये कार्यरत असलेल्या जया सहाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सुशांतच्या चहामध्ये तीन ते चार थेंब सीबीडी ऑइल टाकून देण्याचा सल्ला जया सहाने रिया चक्रवर्तीला चॅटद्वारे दिला होता त्यानंतर पहिल्यांदाच जया सहा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाच्या घेर्‍यात आली होती.

जया सहाचे चॅट फक्त रिया चक्रवर्ती सोबतच नसून नम्रता शिरोडकर सोबत ही समोर असल्याचे दिसून आले आहे. नम्रता शिरोडकर ड्रग्सची मागणी जया सहाकडे करत होती. जयाने तुझी इच्छा माझ्यासाठी आदेश अशा स्वरूपाचे उत्तर या चॅटमध्ये दिले आहे. आता बॉलिवूडमधील अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून जयाची जवळपास 6 तास चौकशी झाली. त्यामध्ये तिला ड्रग्स पेडलर कोण होते, ज्यांच्याकडून ती सेलिब्रेटिंसाठी ड्रग्स घेत होती. जयाला तिचे चॅट दाखवून विचारण्यात आले की, एका चॅटमध्ये तिच्या आणि नम्रता शिरोडकरमध्ये ड्रग्स संदर्भात चॅट होत आहेत. त्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like