भाजपचं काँग्रेसीकरण सुरू, आम्ही मोठी केलेली लोकं BJP घेत असल्याचा जयंत पाटलांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आजी माजी पदाधिकारी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आम्ही मोठे केलेले लोक भाजप घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच राजकारणात रेडिमेड कपडे घेणाऱ्यांपेक्षा कपडे शिवून घेणारे लोक महत्वाचे असतात असा टोलाही पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला आणि स्वतःच्या मापाचे कपडे शिवून घेण्याचा सल्लाही दिला.

भाजपचे काँग्रेसीकरण सुरु असल्याचे सांगत तुम्ही लोकांना पक्षात तर घेता परंतु मग त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं काय ? असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

आमचे सच्चे कार्यकर्ते कोठेही जाणार नाहीत, आमचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि महिला आघाडीचं कोणी गेलं असेल तर त्याचा नगण्य परिणामही आमच्यावर झालेला नाही असही पाटील यांनी स्पष्ट केले. आघाडीची चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांचं महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन –
जे पक्ष सोडून गेले आहेत,त्यांचा विचार करू नका ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे गेले आहेत. आपल्याला पक्ष अजून पुढे न्यायचाय त्यामुळे जोमाने काम करा असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महिला कार्यकर्त्यांनसमोर व्यक्त केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like