Jayant Patil | खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारणे अत्यंत दुर्दैवी : जयंत पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil | सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना खत घेताना त्यांची जात विचारली जात आहे. या प्रकारामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या सगळ्या प्रकाराचा निषेध केला आहे. या प्रकारामुळे समाजात जातीभेद वाढेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

काय म्हणाले जयंत पाटील?
“खत हवं असेल तर जात सांगा हा प्रकार सांगलीपुरता मर्यादित असेल, असं मला वाटत नाही.
हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आणि कदाचित देशातही असेल. अशाप्रकारे शेतकऱ्याला त्याची जात विचारून मग खत देणे हे अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.” असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे समाजातील जातीभेद आणखी वाढेल. याचे भान सरकारने ठेवले पाहिजे.
तसेच असे प्रकार ताबोडतोब बंद केले पाहिजे,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Web Title :Jayant Patil | asking farmer caste for fertilizer is unfortunate and shocking jayant patil ncp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई