Jayant Patil | ‘मुंबईमध्ये भाजपने मनसेला जवळ केलं तर….’; राष्ट्रवादीने सांगितलं BJP-MNS मधील ‘राज’कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली. तेव्हापासून भाजप (BJP) आणि मनसेच्या (MNS) मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत (BJP MNS Alliance News). अशातच यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसेवर निशाणा साधत भाजपला टोला लगावला आहे.

 

मुंबईमध्ये भाजप जर मनसेसोबत गेली तर त्यांना त्याचा किती फटका बसू शकतो यांचा अंदाज भाजपला आला आहे. यामुळेच भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा चालू होत आहे. तिकडे जाण्याअगोदर पाटील यांनी (Jayant Patil) बंगल्यावर माध्यमांशी संवाद साधला.

 

मनसेचं मतदान हे भाजपला (BJP) मिळणार नाही. भाजपची मनसे पक्षाला जवळ करायची पूर्वीपासूनच इच्छा फार आहे पण अजून त्यांनी ते धाडस केलेलं नसल्याचं पाटील म्हणाले. यावेळी बोलताना पाटलांनी, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्लाच्या प्रकरणावरही आपली प्रतिक्रया दिली.

 

दरम्यान, शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रकार निंदनीय आहे.
प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील,
असं जयंत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Jayant Patil | BMC Elections BJP MNS NCP Jayant Patil On BJP MNS Alliance

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा