‘सरकार 5 वर्ष काय 15 वर्ष टिकेल’, जयंत पाटलांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की आमच्याकडून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे की नाही हे मला माहिती नाही. परंतू सर्व काही निर्णय घेऊन 2 दिवसानंतर ठरवलं जाईल. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तर सरकार 5 काय 15 वर्ष टिकेल असा दावा जयंत पाटलांकडून करण्यात आला.

5 वर्ष सरकार टिकेल –
या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की उद्या बैठकीनंतर तातडीने पावले उचलली जातील. मित्र पक्षांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेण्यात येईल. सरकार पाच वर्ष टिकले का असे विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की सरकार पाच वर्ष टिकावे याचसाठी सर्व मुद्यांवर चर्चा आणि बैठक सुरु आहे. सरकार 5 वर्ष काय 15 वर्ष टिकेल.

शिवसेनेसोबत सरकार कसे चालवणार यावर बोलताना जयंत पाटलांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत सरकार चालवण्याचा अनुभव आहे. शिवसेना पहिल्यांदाच आमच्यासोबत सरकारमध्ये असेल. त्यामुळे सरकार चालवताना सहकार्य आवश्यक असेल.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे तसेच या सर्व मुद्द्यांवर आमचे एकमत झाल्याचे देखील पृथ्वीराज चव्हान यांनी सांगितले. तसेच उद्या मुंबईला गेल्यावर आमच्या मित्र पक्षांशी चर्चा होणार आहे आणि मग त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक मुंबईमध्ये पार पडेल असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Visit : Policenama.com