भाजपचं हिंदुत्व तेव्हाच पुसलं गेलं, कॅबिनेट मंत्री जयंत पाटलांचा नितीन गडकरींना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यानंतर भाजपकडून रोजच शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत असतो. आता यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटलांनी शिवसेनेवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्वाचा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितला. काँग्रेसने कधी शिवसेनेला समोर उभं राहू दिलं नाही. परंतु हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून शिवसेला काँग्रेसमध्ये सहभागी झाली. त्यामुळे जनतेत नाराजी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सवाल विचारला की काश्मीरमध्ये पीडीपीसोबत का गेले होते.

यानंतर आता जयंत पाटलांनी गडकरींना उत्तर दिले. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीत मंत्रिपदाची शपथ घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी भाजपचं हिंदुत्व पुसलं गेलं आहे. गडकरींची व्याख्या अशी असेल तर भाजपला हिंदुत्वाचा पुरस्कार करता येणार नाही. तसेच गडकरींचा प्रयत्न आहे की हिंदु मतं भाजपच्या पारड्यात पडावी.

हिंदुत्वावरुन शिवसेना-भाजप वाद रंगला असून त्यात आता राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी उडी घेतली आहे. भाजप शिवसेनेला हिंदुत्वावादावरून घेरत आहे. तर शिवसेना भाजपने विविध ठिकाणी केलेल्या विचित्र युत्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/