×
HomeराजकीयJayant Patil | 'या' कारणामुळं जयंत पाटील यांनी गृहमंत्री पद नाकारलं

Jayant Patil | ‘या’ कारणामुळं जयंत पाटील यांनी गृहमंत्री पद नाकारलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पदावरून पायउतयार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले होते. कारण 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद त्यांनी सांभाळले होते. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांना या खात्याचा अनुभव होताच त्यामुळे देशमुखांनंतर गृहमंत्री पद जयंत पाटील यांनाच मिळणार असे स्पष्ट झाले होते. मात्र, हे पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामागील कारण अस्पष्ट होत. मात्र आता सांगली जिल्हा पोलीस (Sangli Police) दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी गृहमंत्री (Home Minister) पद नाकारण्यामागचं खरं कारण जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी हे कारण सांगताना आर. आर. पाटील यांच्याकडून घेतलेल्या एका सल्ल्याचा किस्साही सांगितला.

Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !

जयंत पाटील म्हणाले, 2009 मध्ये आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाने मला हे पद सांभाळायचंय आहे असे सांगितले. एका लग्नाच्या कार्यक्रमात आर आर पाटील (R.R. Patil) याची भेट झाली. त्यावेळी मी त्यांना गृहखातं कसं असतंय? हे विचारलं. त्यावेळी आबांनी थेट तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का? डायबिटीस आहे का? अशी विचारणा केली त्यावर मी नाही म्हंटल्यावर मग तुम्ही गृहमंत्री व्हा, हे दोन्ही त्रास तुम्हाला सुरु होतील, असे मिश्कीलपणे आबांनी सांगितले. त्यानंतर पदाची सूत्रे स्वीकारली. त्या काळात मला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु देखील झाला. मलाच नाही तर माझ्या खासगी सचिवाला देखील त्रास सुरु झाला होता. गृहमंत्री झालो आणि तेव्हापासून ब्लड प्रेशरचा त्रास मागे लागला. पण पुन्हा तेच पद स्वीकारून आता डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नाही, असं मत तयार झालं होतं असेही त्यांनी यावेळी (Jayant Patil) सांगितले.

लोकांच्या मदतीला पोलीस ठाणे असतात. इथे आल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल असे वातावरण आपण तयार करायला हवे. या वास्तूची भीती वाटायला नको. सांगली पोलीस दल गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे काम करत आहे. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल धाडसाने हस्तगत करून तो लोकांकडे सुपूर्द केला आहे अशा शब्दात जयंत पाटील (Jayant Patil) सांगली पोलीस दलाचं कौतुक केलं.

हे देखील वाचा

Pune Crime | पतीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून विवाहितेची आत्महत्या

Pune News | बिबवेवाडीमध्ये निघाला नाग; सर्प मित्राकडून जीवदान (Video)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jayant Patil | Due to this reason, Jayant Patil refused the post of Home Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News