Jayant Patil ED Inquiry | सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आले, पण अजित पवारांचा नाही; जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी ईडीकडून चौकशी (Jayant Patil ED Inquiry) करण्यात आली. ईडीने त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. ही चौकशी संपवून जयंत पाटील ईडी कार्यालयाबाहेर (Jayant Patil ED Inquiry) आल्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांचे फोन आले आणि त्यांनी विचारपूस केली. अजित पवारांचा (Ajit Pawar) फोन आला होता का असे विचारले असता त्यांनी अजित पवारांचा फोन आला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. यावरुन आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी  झाल्यानंतर रात्री ते ईडी कार्यालयाबाहेर आले. रात्री बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटलांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचे सांगितले. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडे काही प्रश्न राहिले असीतल, असं मला वाटत नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीबाबत राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे मौन असल्याची चर्चा असताना जयंत पाटील
यांनी मात्र सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याचे सांगितले. कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल.
त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील सर्वच
मित्रांचे फोन आले. आज सकाळीही फोन आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यानी फोन केल्याचे सांगितले.
पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला.
माध्यमांनी त्यांना अजित पवारांचा फोन आला होता का, असे विचारले.
त्यांचा फोन आलेला नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं.

Web Title :  Jayant Patil ED Inquiry | ncp jayant patil ed inquiry says no phone call from ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – कॉलेजचा मित्र घरी सोडायला आल्याने दुसर्‍या मित्राने केला विनयभंग; आक्षेपार्ह फोटो टाकून केली बदनामी