Jayant Patil | 12 आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे आदर्श राज्यपालांना कितपत मान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने (State Government) राज्यपालांना (Governor) आठवण करुन दिली आहे. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

सातारामध्ये पत्रकारांनी जयंत पाटील यांना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबात प्रश्न विचारला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. देशात आणि राज्यात आमदारांच्या (MLA) नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा आशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय असाही प्रश्न त्यांनी केला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, आमच्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन पाठवली आहे. परंतु प्रलंबित नियुक्त्या (Pending appointment) राज्यपाल यांच्याकडून रखडल्या आहेत. राज्य सरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकाऱावर गदा येतेय का ? हा खरा प्रश्न आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Titel :- Jayant Patil | How much the ideal governor agrees to delay the appointment of 12 MLAs

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या