Jayant Patil | ‘पुन्हा निवडणुका झाल्या तर 105 वरुन 40 येतील’, जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित असलेल्या संपत्तीवर आयकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या प्रापर्टी असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु त्या त्यांच्या आहेत की नाही हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामी करण्यासाठी भाजप (BJP) हे करत आहे. अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, आम्ही निवडणुकांना घाबरत नाही पुन्हा जर निवडणुका झाल्या तर त्यांचे 105 वरुन 40 वर येतील असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला.

 

जयंत पाटील (Jayant Patil) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटील यांनी राज्यात घडत असलेल्या घडामोडी आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh), अजित पवार यांच्यावरील कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला. भाजप स्वत:च्या चुका लपवण्यासाठी हे सर्व काही करत आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी हे इव्हेंट केले जात आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) एजन्सी ह्या भाजपच्या हस्तक झाल्यात. राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका पाटील यांनी यावेळी केली.

 

अजित पवार यांच्या प्रापर्टी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्या त्यांच्या आहेत की नाही हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामी करण्यासाठी भाजप हे करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. मुळात भाजपला टोकाचा विरोध करुन राष्ट्रवादी सत्तेत आहे. हे भाजपला रुचत नाही, सर्व मार्गांने त्रास देणं, हे भाजपने पूर्णपणे ठरवलं असल्याचे पाटील म्हणाले.

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला, तो देश सोडून पळून गेला आहे.
ज्या ठिकाणी पैशाची देवाण घेवाण कुठं झाली नाही, तिथं अटक करणे म्हणजे बदला घेणं आहे, वचपा काढणं आहे,
एखाद्याला राजकीय दृष्ट्या संपवण्याच काम आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

आजच देगलूर पोटनिवडणुकीचा (Deglaur by-election) निकाल लागला, त्यात भाजपची कशी धूळधाण झाली हे पाहतोय.
त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नाही पुन्हा निवडणूक घेतली तर चंद्रकांत पाटलांचे 105 होते ते 40 वर येतील,
असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

 

Web Title :- Jayant Patil | if there is a re election it will go from 105 to 40 jayant patil told chandrakant patil on nanded election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके

Khajoor 10 Benefits In Winter | खजूरला वंडर फ्रूट का म्हणतात? जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 10 फायदे

Pune News | दिवाळी निमित्त फुटपाथवरील 100 हून अधिक मुलांना कपड्यांचे वाटप; युवा उद्योजिका, फॅशन डिझायनर पायल भरेकर यांचा अनोखा उपक्रम