Jayant Patil | ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुटकेबाबत विश्‍वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो’, राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांचे केंद्र सरकार विरोधात गार्‍हाणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | रशिया (Russia) आणि युक्रेनदरम्यान (Ukraine) युद्धाचे (War) सावट दिसत असताना दोन अडीच आठवड्यांपुर्वी मी आणि अन्य काही जणांनीही केंद्र सरकारला (Central Government) तेथील विद्यार्थ्यांना भारतात (India) परत आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. परंतू आपण जरा उशिरा जागे झालो. विद्यार्थ्यांची (Student) प्रचंड आबाळ होत असून आपली सुटका होईल की नाही याबद्दल त्यांना विश्‍वास वाटत नाही. त्याअर्थी आपण कुठेतरी कमी पडतो अशी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी युक्रेनमधून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आगामी निवडणुकांच्या (Election) पार्श्‍वभूमीवर परिसंवाद यात्रेचे (Parisanvad Yatra) आयोजन करण्यात आले आहे. यासाठी येथे आलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता, त्यांनी वरिल प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) हे देखिल उपस्थित होते.

 

जयंत पाटील म्हणाले, की आजच युक्रेनमध्ये कर्नाटकातील (Karnataka) विद्यार्थ्याचा मृत्यू (Student Death) झाल्याची चिंताजनक घटना घडली आहे. युद्धाचे सावट दिसताच दोन ते अडीच आठवड्यांपुर्वीच माझ्यासह काहीजणांनी युक्रेनमधील अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. परंतू आपण जरा उशिरा जागे झालो. मी काही विद्यार्थ्यांशी व पालकांशीही संवाद साधला. काहींनी तेथिल व्हिडीओ देखिल पाठवले आहेत. विदारक परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची आबाळ होत आहे. आपली सुटका होईल याबद्दल त्यांना विश्‍वास वाटत नाही. त्याअर्थी आपण कुठेतरी कमी पडतो असे दिसतेय. परंतू आतातरी केंद्रांने विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.

ईडीने (ED) अटक केलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा (Resignation) घेण्याचा प्रश्‍न उदभवत नाही.
सध्या विरोधक राज्यातील मंत्र्यांवर उठसूठ रोज आरोप करत आहेत.
केंद्रांत त्यांचेच सरकार असल्याने केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) मागे लावून जनतेमध्ये मंत्र्यांची बदनामी करायची एवढाच काय तो उद्देश आहे.
त्यामुळे उठसून राजीनाम्याची मागणी केली जात आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यासंबधित प्रश्‍नाला उत्तर देताना लगावला.
तसेच आगामी निवडणुका आघाडीसोबत लढण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर चर्चा करूनच घेतला जाईल, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title :- Jayant Patil | Jayant patil russia ukraine war Indian Students Central Government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’

 

Pune Cyber Crime | क्रिप्टो करन्सी गुंतवणुक योजनेत अनेक पुणेकरांची फसवणूक; सायबर पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून केली अटक

 

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !