Jayant Patil | ‘झुकेंगे नही, लड़ेंगे और जीतेंगे भी’, जयंत पाटलांचा भाजपला टोला

पुणे / तळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ‘दिल्ली समोर कधी झुकायचं नाही’ ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी दिली आहे. ‘झुकेंगे नाही लढेंगे…और जीतेंगे भी’ असे म्हणत राज्यमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला (BJP) टोला लगावला. जयंत पाटील तळेगाव येथील जाहिर सभेत बोलत होते. मागील काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) कारवाई करताना दिसत आहे. यावरुन जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्रावर निशाणा सधला.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मावळात (Maval) आम्हाला शिकवण दिली. झुकायचं नाही, वाकायचं नाही, लढायचं. शेवट पर्यंत लढत असताना आपल्याला महाराष्ट्रात (Maharashtra) दिल्लीश्वराने नेहमी कपट कारस्थान केली. दिल्लीचा (Delhi) हुकूमशाह किती ही कावेबाज असला तरी महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकनार नाही. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, असे पाटील यांनी सांगितले.

 

राज्यातील सरकार त्यांना डोळ्यात सलत आहे.
राज्यातील सरकार (State Government) मोडून काढण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करण्याची त्यांची तयारी आहे.
आमदारांना आमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वी त्यांनी हे प्रयत्न केले.
मात्र, काही होत नसल्याने त्यांनी मंत्र्यांवर धाडी घालण्याचे काम सुरु केले.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची काय अडचण होती. त्यांची काय चूक होती, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil slams bjp says we are from Chhatrapati shivaji maharaj state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Weakness | डायबिटीजमध्ये अशक्तपणा आल्यास ‘या’ 5 गोष्टींचा जेवणात करा समावेश, ब्लड शुगरसुद्धा राहील कंट्रोल !

 

Salman Khan Wedding Rumors News | अभिनेता सलमान खाननं सोनाक्षीसोबत उरकलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर व्हायरल फोटोने घातला धुमाकूळ

 

Phone Papping Case | फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी करा – नाना पटोले