Jayant Patil | ‘दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी..’ – जयंत पाटील

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) फोडण्यासाठी शरद पवारच (Sharad Pawar) जबाबदार असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते (Eknath Shinde Group Spokesperson) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) प्रत्युत्तर दिले आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, केसरकरच पवार यांना सिंधुदुर्गच्या समुद्रकिनार्‍यावर (Sindhudurg Beach) फिरवायचे.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, दीपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते? सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी दीपक केसरकरच कायम पवार यांच्या मागे असायचे. केसरकर हे खरे शिवसैनिक नाहीत. आता दीपक केसरकरांचे स्थानिक मतभेद झाले म्हणून ते तिकडे गेलेत. ते काय खरे शिवसैनिक नाहीत. त्यांचे मनही शिवसैनिकासारखे नाही. त्यामुळे दीपक केसरकर आता जे बोलतायत त्यात कुठेही तथ्य नाही.

 

जयंत पाटील पुढे म्हणाले की, कधीही शिवसेना फोडण्याचे काम पवार यांनी केलेले नाही. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पवार यांचे संबंध लक्षात घेता या गोष्टी निराधार आहेत.

काय म्हणाले होते केसरकर
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले होते की, मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे.

 

केसरकर म्हणाले होते, जरी मी नारायण राणेंना (Narayan Rane) बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावे याची अट ठेवलेली नव्हते, असे शरद पवारांनीच मला सांगितले होते. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती.

 

केसरकर म्हणाले होते, त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे.
‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचे मी ऐकलेले नाही.
आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हते.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil slams deepak kesarkar over his comment saying sharad pawar broke shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Scholarship Exam | प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी