Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil | सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचे आज (दि.२७) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार फटकेबाजी केली.

सांगली जिल्ह्यातील एकोप्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘आमदार अरुण लाड (Arun Lad) यांना विधानपरिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वांनी मदत केली. आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी देखील त्यांना मदत केली. अरुण अण्णांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते शरद लाड (Sharad Lad) यांचे कौतुक करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचे सर्व नेते आता एकत्र येऊन काम करत आहे आणि पुढेही करूया, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) उपस्थित होते. त्यावेळी संजय पाटील यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले की, काका कानाला बोटे लावा.’

यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, ‘राज्यात इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त विद्यार्थी
असताना फॉक्सकॉन सारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. वेगवेगळ्या प्रथा, लव जिहाद मोर्चा निघत आहेत.
धर्मा-धर्मात विष कालवण्याचे काम जे करत आहेत त्यांना आज लाड, नायकवडी याचा विचार सांगा.
जी.डी. बापूंनी क्रांती लढ्यात जिल्ह्यातील लोकांचा आवाज उठवला. कुंडल हे स्वातंत्र्यसंग्रामचे केंद्र होते.
कृष्णेच्या पाण्याचा धाक ब्रिटिशांना देखील येथील स्वातंत्र्यसैनिकांनी दाखवला.’
असे देखील यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

तसेच पुढे बोलताना जयंत पाटील यांनी जीडी बापू, क्रांतीसिंह नाना पाटील, नागनाथ आण्णा यांचे विचार
नव्या पिढीला सांगण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, ‘आपण एकसंध राहण्याची गरज आहे.
एकसंध राहून महाराष्ट्रचे चित्र बदलण्याचे काम करायचं आहे. जी. डी. बापूंचे जन्मशताब्दी शतक पूर्ण झाले आहे.
ज्या घटकांना न्याय द्यायचा होता, त्या घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी शपथ घ्यायची आहे.
आज राज्यात लव्ह जिहाद अशा गोष्टींचा प्रचार सुरू झाले आहेत.
निवडणूक जवळ आल्या, की अशा गोष्टी सुरू होतात.
त्यामुळे धर्मा-धर्मामध्ये तिढा निर्माण करण्याचे काम होत असेल, तर जीडी बापू लाड, क्रांतीसिंह नाना पाटील,
नागनाथ अण्णा नायकवडी यांचे विचार सांगण्याची गरज आहे. असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

Web Title :- Jayant Patil | jayant patil take jibe on bjp mp sanjay kaka patil in inaugurated the shrine of bapu lad kundal sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात