Jayant Patil | फडणवीस जे सांगतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकतात अशी अगोदर आमची खात्री होती, पण आता…, जयंत पाटलांची फटकेबाजी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभागृहात तुफान फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोपरखळ्या लगावल्या. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (CM) होती, अशी आमची अपेक्षा होती. एवढ सगळा सुरत (Surat) गुवाहाटीचा (Guwahati) प्रवास केला, शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) 17 वेळा सुरत लुटली त्याच सुरतेला तुम्ही शरण गेलात, स्वारी करण्यासाठी नाही, तुमच्या शरणागतीने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. पुढे सुरत वरून तुम्ही गुवाहाटीला गेला. तिथे तुम्ही कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला गेला होतात म्हणे, पण तिथे अनेकांनी डोंगार, झाडी, हाटील पाहिलं हा सगळा प्रवास करुन झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं आम्हाला वाटलं. देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ऐकतात, अशी अगोदर आमची खात्री होती. मात्र आता तो आमचा समज आहे, अशा शब्दात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तुफान फटकेबाजी केली.

 

त्यांना डायरेक्ट सीएम इन वेटिंग केलं
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी आमची अपेक्षा होती. सुरत गुवाहाटीचा प्रवास केल्यावर तेच मुख्यमंत्री होतील, असं सगळ्यांना वाटायचं, पण त्यांना सीएम इन वेटिंग केलं डायरेक्ट… म्हणजे ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग भविष्यात येऊ शकतो, असं आम्ही समजत होतो. त्या नेत्याला उपमुख्यमंत्री करुन महाराष्ट्राच्या एका नेत्याचा भाजपने (BJP) अपमान केला, असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळले.

शिवसैनिकांना प्रचंड वेदना झाल्या
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर निशाणा साधताना जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दात टोले लगावले. भाजप-शिवसेना सरकार (BJP-Shiv Sena Govt) सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांची मी एक क्लिप पाहिली, त्यात ते भाजपच्या कारभारावर चिडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांच्या हातात राजीनामा देतात. पण आज गुवाहटीला जाऊन भाजपसोबत हातमिळवणी करुन शिंदेंनी सरकार (Shinde Government) स्थापन केलं. त्याचवेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मुलाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरुन खाली खेचताना त्यांना माहिती नाही पण शिवसैनिकांना प्रचंड वेदना झाल्या, असे पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जातील, असं वाटत होतं, पण फार दिवसांनी त्यांना आठवण झाली, असा टोमणा त्यांनी शिंदेंनी लगावला.

 

मंत्रिमंडळात एकच ध्रुवतारा
खातेवाटपात काय झालं, चंद्रकांतदादांवर (Chandrakant Patil) किती अन्याय…
उच्च आणि तंत्रशिक्षण खाते चंद्रकांत दादांना दिले.. मंत्रिमंडळात एकच ध्रुवतारा आहे
तो म्हणजे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)… त्यांचं पाणीपुरवठा खाते कोणालाही बदलता आलं नाही..
सगळ्यांची खाती बदलली पण त्यांचं खातं बदललं नाही. आमचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)…
किती तुमची बाजू घ्यायचे पण त्यांनाही एक्साइज डिपार्टमेंट (Excise Department) दिलं,
अशा शब्दात जयंत पाटील यांनी खातेवाटपावर तिरकस बाण सोडले. यावर मंदा म्हात्रे (Manda Mhatre) म्हणाल्या,
एक्साईज खातं चांगलं आहे.. त्यावर पुन्हा जयंत पाटील म्हणाले, कसं काय चांगलं आहे…
अच्छा गणेश नाईकांकडे (Ganesh Naik) एक्साईज खातं होतं, त्यामुळे मंदाताई तुम्हाला ते खातं चांगलंच वाटणार… असा मिश्कील टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- Jayant Patil | jayant patil taunts deputy cm devendra fadanvis maharashtra monsoon session news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic Health Benefits | ब्लड प्रेशरपासून कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचे काम करतो लसून, जाणून घ्या तो खाण्याचे 5 फायदे

 

Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील DRDO संस्थेत बिबट्याचा वावर ?, परिसरात प्रचंड खळबळ

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 50 हजारांची लाच मागणारा कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात