Jayant Patil | परमबीर सिंह यांच्या आरोपांवर जयंत पाटील म्हणाले, ” मी कधीच असं कुणालाही… “
पुणे: Jayant Patil | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरही आरोप केले होते.
जयंत पाटील यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असा आरोप त्यांनी केला होता. त्या आरोपांवर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा (Shiv Swarajya Yatra) सुरू आहे. आज ही यात्रा हडपसर येथे आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते काय बोलत आहेत, या विषयी मला जरा देखील माहिती नाही. मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का? मी त्यांना असं का सांगू, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “पक्ष कधीच कोणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली?
आरोप होऊन किती वर्ष झाली, ३ वर्षानंतर काही गोष्टी सांगत असतील तर त्याकडे किती लक्ष द्यायचं,
फक्त परमवीर सिंह यांची चौकशी सुरू आहे ती व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा”, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा