Jayant Patil | ‘एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल’, मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरुन जयंत पाटलांचा खोचक टोला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्याने पदभार दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवावा अशी मागणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे तर कामावर रुजू झाले आहेत, कालच त्यांनी बैठक घेतली, जर पाटील अशीच मागणी रोज करत असतील तर एकदा बोलावं लागेल, असे म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. जयंत पाटील (Jayant Patil) सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

देशात भाजपला सोडून आता मतदार दुसऱ्या बाजूला झुकत आहे. हे प्रत्येक राज्यात पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपचे विद्यमान मंत्री देखील भाजपला सोडून इतर पक्षात प्रेवश करत आहेत. याचा भाजपने विचार करावा असा टोला जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने पदभार दुसऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे, असा प्रश्न त्यांना विचारला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ही तर त्यांची जुनी मागणी आहे. मुळात मुख्यमंत्री हे कामावर रुजू झाले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे (Video Conference) ते बैठकांना हजर राहत आहेत. त्यांचे काम कुठे अडले नाही, ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. आता पाटील अशी रोज रोज मागणी करत असतील तर मला त्यांच्याशी बोललं पाहिजे, ते रोज का बोलत आहेत, हे मला कळले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title : Jayant Patil | Maha Vikas Aghadi Minister jayant patil on cm uddhav thackeray post should be given to another demanded chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात