Jayant Patil | ‘त्या सर्वांच्या प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला, कहाण्या 8-10 दिवसात समोर येतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) पहिला टप्पा पार पडला. मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (Shinde Group) अनेक आमदारांना अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारला टोला लगावला आहे. प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या 8-10 दिवसात समोर येतील, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले.

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष (Maharashtra Opposition Party) म्हणून उत्तम काम करु आणि जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांनाच बरोबर घेऊन जाणं हे सोपं काम नाही. आज पुन्हा एकदा भाजपने ते करुन दाखवलं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा त्यांचा चॉईस असतो असतो. मात्र बघणाऱ्यांकडे ते मंत्रीमंडळ कसं दिसतं हा जनतेचा चॉईस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहकारी निवडून आपली कामगिरी बजावली आहे, आता जे सहकारी आहेत त्यांच्यात काय-काय अभाव आहे. कोणत्या प्रकारचे, कोणत्या पद्धतीचे, कोण बाहेर राहिले आणि कुणाच्या प्रचंड अपेक्षा असताना भ्रमनिरास झाला आहे याच्या कहाण्या येत्या 8-10 दिवसांत समोर येईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil),
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), गिरीष महाजन (Girish Mahajan),
विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan),
मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) आणि सुरेश खाडे (Suresh Khade) या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil),
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), उदय सामंत (Uday Samant), संजय राठोड (Sanjay Rathod),
दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे (Dada Bhuse) आणि तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

Web Title :- Jayant Patil | maharashtra cabinet expansion ncp jayant patil slams eknath shinde devendra fadnavis government ministers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणार्‍यांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिवस’; ‘त्या’ आमदाराचा टोला

 

Facebook | 15 वर्षाच्या मुलीचे HIV पॉझिटिव्ह मुलाशी फेसबुकवर झाले प्रेम, प्रेमात स्वत: ला टोचून घेतले ‘एड्सचे इंजेक्शन’

 

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ