Jayant Patil | ‘मी फक्त शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडूनच बुके घेणार’; असं का म्हणाले जयंत पाटील, चर्चेला उधाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसापासून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) हे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या नेहमीच संपर्कात असताना दिसत आहे. यावरून राजकारणात तर्कवितर्क चर्चा होत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी साताऱ्यातील कार्यक्रमावेळी बोलताना शाब्दिक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला (District Central Bank) भेट दिली. त्यावेळी बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला, त्यावेळी ‘मी फक्त शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडूनच बुके घेणार’ असल्याचं जाणत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.

जलसपंदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे आज (शनिवारी) साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी साताऱ्यात एका कार्यक्रमानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती आणि पवारांनीही त्यांना सातारा मेडिकल काॅलेजसाठी भरघोस निधी दिल्याने ही भेट सतत होत राहिली, म्हणून आता शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) भाजप सोडणार का ?, असा प्रश्न देखील यावरून समोर येत आहे. परंतु, आज जलासपंदा मंत्री जयंत पाटील यांनीच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत भेट दिल्याने या भेटीचे नेमके कारण काय? यावरही तर्कवितर्क होऊ लागले आहेत.

या दरम्यान, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागील विधानसभेत भरगोस मतांनी विजयी झाले आहेत.
त्यांनी सातारा-जावळी मतदार संघात (Satara-Jawali constituency) आपली पक्कड मजबूत केली आहे.

त्यावेळी त्यांचे विरोधक असणारे राष्ट्रवादीच्या दीपक पवारांचा त्यांनी पराभव केला होता.
असे असले तरी गेल्या लोकसभेत मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पावसातील सभेमुळे नवं वळण लागलं.
आणि तेथे राष्ट्रवादीची खासदारकीची शीट निवडून आली होती.

Web Title : Jayant Patil |mla-shivendrasinharaje-bhosale-met-on-minister-jayant-patil-at-satara-district-bank

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

COVID 19 मधून बरे झाल्यानंतर तुमची मुले ‘या’ आजारांची शिकार तर होत नाही ना? जाणून घ्या लक्षणे