Jayant Patil | राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अन् मंत्री जयंत पाटील म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – जळगाव (Jalgaon) येथील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy rain) पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आज (शनिवारी) चाळीसगावच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान पाटील (Jayant Patil) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर भाष्य केलं आहे. त्यावेळी पाटील हे माध्यंमाशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे. सत्तेत असलेल्या राज्य सरकारने शिफारस केलेली नावे तपासून त्यावर राज्यपालांनी निर्णय देणे अपेक्षित असते. परंतु राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत, असे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटायला लागले आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर (Governor Bhagat Singh Koshyari) टीका केलीय.

राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 जणांच्या नावांबाबत राज्यपालांनी आता लवकर निर्णय घ्यायला हवा, अशी आमची मागणी आहे.
यापूर्वी जी यादी राज्य सरकारने राज्यपालांना सादर केली आहे, त्यातून कोणाचेही नाव वगळलेले नाही.
आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना या विषयाबाबत विनंती केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
म्हणुन राजु शेट्टी याचं नाव वगळण्यात आलं नसल्याचं जयंत पाटील यांनी एकप्रकारे सूचित केलं आहे.

Web Title : Jayant Patil | mlc appointment what jayant patil says about candidature of raju shetty

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aadhaar Card केंद्र चालक जास्त पैसे मागत आहे का? जाणून घ्या कुठं अन् कशी करावी तक्रार

IT Refund | इन्कम टॅक्स विभागाने रिफंड केले 67401 कोटी रुपये, 24 लाख करदात्यांना फायदा, जाणून घ्या

Indian Railways, IRCTC | रेल्वेने प्रवाशांना दिली ‘ही’ मोठी सवलत, जाणून घ्या कोणती