Jayant Patil | हिंदू देवस्थानच्या जमिनी हडपण्याचं राज्यात षडयंत्र, जयंत पाटलांचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात हिंदू देवदेवतांचा सन्मान झाला पाहिजे अशी मागणी ज्या बाजूचे लोक करत असतात त्यांच्याच राज्यात हिंदू देवस्थानच्या जमिनींची (Hindu Temple Land) लूट सुरू आहे. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनी हडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. तसेच यामागे कोण अधिकारी आहेत, राजयकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा करावा अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे

जयंत पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले, एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. गायरान जमिनीची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना राहायला जागा नाही असे गोरगरिब लोक नाईलाजाने त्या जमिनींवर अतिक्रमण करुन तिथे राहत आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाची दखल घेण्यात यावी.

लवकर नोकरभरती करावी

नोकरभरती (Recruitment) का होत नाही? मुले पीडब्ल्यूडी मध्ये (PWD) परीक्षा देऊन घरी बसले आहे. त्यामुळे सरकारने त्यांची दखल घ्यावी. 2020 च्या एमपीएससी (MPSC) बॅचच्या मुलांना अद्याप कामावर रुजू करुन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे केवळ निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशा अनेक मुद्यांवर जयंत पाटील यांनी सभागृहात मतं मांडली.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा

विविध मार्गाने निधी उभा करून आपण सर्वांनी समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) तयार केला. अर्थसंकल्पात (Budget) अर्थमंत्र्यांनी घोषणा केली गोव्यापर्यंत रस्ता बनवणार आहे. गडकरी साहेबांच्या मदतीने सांगलीतही रस्ता बनतोय. तिथल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा त्यासाठी सरकारने केंद्रीय मंत्र्यांशी बोलावे. गोव्यापर्यंत जो हायवे बनणार आहे त्यासाठी निधी कुठून उभा करणार आहेत? ही गोष्टी सभागृहाला कळायला हवी. घोषणा चांगल्या आहेत, मात्र उभारणी करताना पैसे कसे उभे करणार?, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांसाठी विम्याचा प्रश्न गंभीर

कृषी विभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कांद्याला, कापसाला भाव नाही.
शेतकऱ्यांसाठी विम्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांनी प्रिमियम भरण्यास कधीच विरोध केला नाही.
विमा कंपन्याच्या जाचक अटींबाबत शेतकऱ्यांना तक्रारी आहेत. सरकारने या सर्व बाबींकडे गांभीर्याने पहावे.
आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत.
त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Web Title :  Jayant Patil | ncp jayant patil alleges that lands belongs to hindu temples are mishandled in maharashtra slams eknath shinde devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार