Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडेल, जयंत पाटील यांचे भाकित

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डी येथे विचारमंथन शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी राज्यातील राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील शिर्डीत आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यातील शिंदे सरकार (Shinde Government) कधी पडणार याचे भाकित केले आहे. शिबिर सुरु होण्याआधीच जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

 

राष्ट्रवादी पक्ष खंबीर

शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींच्या दाव्याचा समाचार घेतला. राष्ट्रवादी पक्ष खंबीर असून तो फुटणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही, असा ठाम विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडेल

जयंत पाटील यांनी सध्या राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखालील सत्तेत असलेले सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असं सूचक भाकित केलं आहे. आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं, असं म्हणत त्यांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला.

 

पुढची पुजा मवीआचा मुख्यमंत्री करेल – अमोल मिटकरी

सरकारबाबत जयंत पाटलांच्या वक्तव्याला आमदार अमोल मिटकरींनी (MLA Amol Mitkari) दुजोरा दिला आहे.
सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे.
आषाढी (Ashadhi Ekadashi) आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात.
पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री करतील.
आम्हाला विश्वास आहे की 100 च्यावर आमदार आम्ही निवडून आणू.
आगामी काळात राष्ट्रवादीचेच मुख्यमंत्री दिसतील, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला.

 

 

Web Title :- Jayant Patil | ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा