Jayant Patil | जयंत पाटील यांचा टोला, म्हणाले – ‘…तर एकनाथ शिंदेंनी हे आधीच केलं असतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | लोकसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावासाठी विधनसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी, मतदानाच्या कामकाजाला सुरूवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा उल्लेख करत टोला लगावला. जयंत पाटील यांनी कोश्यारी यांचे आभार मानताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नाना पटोले (Nana Patole) यांचे आभार मानले.

 

आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी रिंगणात होते. नार्वेकर यांना या निवडणुकीत एकूण 164 मते मिळाली. तसेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi Government) उमेदवार राजन साळवी (Rajan Salvi) यांना 107 मते मिळाली. या मतदानात रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. (Jayant Patil)

निवडणुक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जयंत पाटील यांनी टोला लगावताना म्हटले की, मला सर्वात प्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत.
गेले अनेक महिने महाराष्ट्राच्या विधानसभेला याची प्रतिक्षा होती. वारंवार आम्ही विनंती करुनही त्यांनी निवडणूक लावली नाही.
ते कशाची वाट पाहत होतो हे आमच्या लक्षात आले.
हे आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हे आधीच केले असते.

 

जयंत पाटील पुढे म्हणाले की, राज्यपालांनी देशाला आदर्श घालून दिला आहे.
आता त्यांनी 12 आमदारांची पाठवलेली यादी तात्काळ मान्य करावी.
यानंतर देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि म्हणाले, नाना पटोले यांच्यामुळे हा दिवस पहायला मिळाला, मित्र म्हणून ते जागले आहेत.

 

Web Title :- Jayant Patil | ncp jayant patil eknath shinde governor bhagat singh koshyari bj devendra fadanvis maharashtra assembly speaker election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’