मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसींच्या आरक्षणाविषयी (OBC Reservation) राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एकटेच बोलत आहेत. पण ओबीसी सेलच्या (OBC Cell) सर्व पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी देखील गावागावात, जिल्ह्यात जाऊन हे सारं बोललं पाहिजे. छगन भुजबळ जे बोलतात, ते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवा, महाराष्ट्रातील ओबीसी समाजात (Maharashtra OBC Community) जनजागृती निर्माण करायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सर्वात पुढे असली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका मांडली. जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनामध्ये बोलत होते.
जयंत पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आजही आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कोणताही निकाल दिला असला तरी कोर्टाच्या चौकटीत बसवून आरक्षणासहीत निवडणुका घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी समाजाला मदत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयीन लढाईवर आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.
भुजबळ साहेब जे बोलतात तेच जनतेमध्ये जाऊन पुन्हा बोलले पाहीजे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजात जागृती निर्माण करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात पुढे असला पाहीजे, अशी अपेक्षा @Jayant_R_Patil यांनी व्यक्त केली.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 25, 2022
ओबीसींची जातनिहाय जनगणना (Caste wise Census) करण्याची मागणी होत आहे. 2011 सालीच जातनिहाय जनगणना झालेली आहे. मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री असल्याने मला याची माहिती आहे. 2011 साली त्याचा तपशील केंद्र सरकारकडे (Central Government) देण्यात आला. परंतु तो तपशील नंतर आलेल्या सरकारने बाहेर काढला नाही. त्यामुळे देशात जातनिहाय जनगणनेचा तपशील बाहेर आला तर आपल्याला सबळ पुराव्याची व्यवस्था होईल. परंतु सध्या हे होईल, असे वाटत नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
.@NCPspeaks पक्षाच्या ओबीसी सेलद्वारे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. ओबीसी आरक्षणावर गदा आली असताना हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सांगतो की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. pic.twitter.com/Hw4NL9lDwp
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 25, 2022
राष्ट्रवादी ओबीसी संघटनेने काही मागण्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil orders party workers to reach to grass root level over obc reservation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update