Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections-2024) भाजप आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) संभाव्य जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 240 तर शिंदे गट 48 जागांवर निवडणूक लढवेल, असे संकेत भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले होते. यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटाला धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच एकटा भाजप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) समोर निवडणूक लढवेल असे भाकीतही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वर्तवले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांनी रात्रीच यावर प्रतिक्रिया देऊन सारवासारव केली. मात्र असे असले तरी भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यासर्व घडामोडींवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप एक
ते सव्वा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत शिंदे गटाचं नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. भाजपच सर्वच्या सर्व 288 जागांवर निवडणूक लढवेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या विरोधात एकटा भाजपच निवडणूक लढवेल. तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्त्व उरणार नाही, असे मला वाटत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील पुढे म्हणाले, देशभरात भाजपच्या वतीनं स्थानिक पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्रात देखील हेच काम त्यांनी सुरु केले आहे. मित्र असो किंवा शत्रू त्यांना फोडणे, नामोहरम करणे
आणि त्यांच्याकडे जाणारी मतं आपल्या बाजूला वळवून घेणे असा कार्यक्रम भाजपचा सुरु असल्याचे पाटील
यांनी सांगितले. तसेच मला खात्री आहे की शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल की त्यांच्या चार ते पाच ठिकाणी
जागा निवडून येऊ शकतात. कारण भाजप सतत सर्वे करत आहे. उरलेल्या सर्व जागांवर भाजप आपले उमेदवार
उभे करेल असे भाकीत जयंत पाटील यांनी वर्तवले.

Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil reaction on chandrashekhar bawankule statement about bjp shinde camp seat sharing formula for 2024 vidhansabha election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीचा गोंधळींबरोबर गोंधळ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Chandrashekhar Bawankule | शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत 48 जागा? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं