Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा तपास यंत्रणांना सल्ला; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil | अंमलबजावणी संचालयाने बुधवारी (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर धाड टाकली. हसन मुश्रीफ घरी नसताना ही धाड ईडीकडून टाकली गेल्यामुळे हसन मुश्रीफ समर्थक चांगलेच आक्रमक झाले. कोल्हापूर येथील कागल मध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हसन मुश्रीफ समर्थकांनी आंदोलन केले. त्यावर अगदी काही वेळापूर्वीच एक व्हिडीओ जारी करत आमदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, ही कारवाई ज्या प्रकारे होत आहे, ती प्रचंड राग येण्यासारखी गोष्ट आहे. काहीही केलेले नसताना देखील वारंवार केंद्रीय यंत्रणांचा वापर कुणीतरी मुद्दामहून करत आहे, असा एकंदरीत अर्थ या सर्व प्रकाराचा होतो. याचीच जाणीव झाल्यामुळे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला आहे. त्याचे ते प्रदर्शन करत आहेत. तुम्ही आयकर विभागाची धाड टाकली त्यात काहीच मिळाले नाही. आता नवीन काहीतरी प्रकरण काढून ईडीची धाड टाकायची. या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात म्हणूनच याविरोधात लोक रोष व्यक्त करत असल्याचे जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच सध्या सत्तेत बसलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रचंड असूया दिसत आहे. राष्ट्रवादीच आपल्याला आव्हान देऊ शकते, अशी भावना त्यांच्यात दिसते आहे. कारण एकामागोमाग एक राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऐनकेन प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि त्यासाठीच यंत्रणांचा वापर सुरू आहे. असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना सत्ताधारी पक्षावर केला. तसेच ते पुढे म्हणाले की, हसन मुश्रीफ यांची आत्तापर्यंतची कारकीर्द ही अतिशय पारदर्शक आणि स्पष्ट आहे. लोकांमधला नेता अशी त्यांची प्रचिती आहे. याआधी त्यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. त्याला बराच कालावधी उलटला आहे. मला वाटतं अशाप्रकारे राजकीय दृष्टीकोन ठेवून कारवाई होणं, हे भारतात, महाराष्ट्रात पुर्वी कधीच झालं नव्हतं. हा नवीन उपक्रम सुरु झालेला आहे. मात्र यंत्रणांनी अशाप्रकारे राजकीय व्यक्ती टार्गेट करुन कारवाई करणे बरोबर नाही. आज महाराष्ट्र आणि देश यंत्रणाचा कसा गैरवापर सुरु आहे, हे पाहतोय असे देखील यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला होता.
दरम्यान त्यात घोटाळा झाल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केले होते.
त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कारखाना चालवायला देणे यात गैर काय?
असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे बालिश आरोप
असल्याचा टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांना लगावला.

Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil slams ed and state governement over hasan mushrif ed raid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर