सांगली: पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलगा देखील राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलगा प्रतिक पाटील (Pratik Patil) याने राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवडूण येत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. राजाराम बापू पाटील कारखान्याच्या संचालकपदी निवडूण येताच प्रतिक पाटील याची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.
स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील हे वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेवेळी संचालक होते. राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर वाळवा सहकारी साखर कारखान्याचे नामांतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना करण्यात आले. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणुनच झाला होता. तब्बल १० वर्षे ते या साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले. आमदार जयंत पाटील यांनी नव्या पिढीला संधी देताना चिरंजीव प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून केला आहे. अशी चर्चा आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी प्रतिक पाटील यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाहाची राज्यभर चर्चा झाली. या विवाहसोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहिले होते. लग्नात सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करून आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता प्रतिक पाटील यांची राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील आपल्या मुलाच्या राजकीय लाँचिंगसाठी तयारी करत असताना दिसून
येत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रे दरम्यान प्रतिक पाटील यांचे डिजीटल पोस्टर लावण्यात आले होते.
त्यावरूनच प्रतिक पाटील यांचे राजकीय लाँचिंग होणार याबाबत जाणकारांकडून अंदाज बांधले जात होते.
आणि आता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याने
त्यांचे जोरदार राजकीय लाँचिंग झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Web Title :- Jayant Patil | ncp leader jayant patil son pratik patik win rajaram sugar factory
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट