Jayant Patil | ‘डंके की चोटपर सांगतो, द काश्मीर फाईल्स पाहायला गेलो’; फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांंचं हटके प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | विधानसभेमध्ये कोणत्या सदस्यांना बोलायला किती वेळ मिळतो यावर चर्चा चालू झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधकांना बोलण्यास वेळ दिला जात नसल्याचं म्हणाले. तेव्हा भाजपचे (BJP) सदस्य सभागृहात नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर फडणवीस आणि पाटील यांच्यामध्ये खरी शाब्दिक जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली.

 

देवेंद्र फडणवीस उठले आणि म्हणाले, आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) बघायला गेलो होतो ‘डंके के चोटे पे’ गेलो होतो. काय आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे. यानंतर पाटलांनी फडणवीसांची फिरकी घेतली. ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही. फक्त निर्मात्याकडे 160 कोटी जमा झाले आहेत. त्यातून काश्मीर पंडितांना (Kashmir Pandit) घर बांधण्यासाठी दान (Donations) करायला सांगा, अशी मागणी पाटलांनी (Jayant Patil) केली.

 

..अन् जयंत पाटील संतापले.
जयंत पाटील बोलत असताना भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) खाली बसून मोठ्याने बोलून त्यांना व्यत्यय आणत होते.
पाटलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी खाली बसून बोलण्याची पद्धत बंद करा.
आम्हालाही खाली बसून बोलता येते, त्यावेळी अडचण झाली तर बोलू नका,असे खडेबोल सुनावले.

 

दरम्यान, सभागृहात ‘काश्मीर फाईल्स’ वरून जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये एक जुगलबंदी पाहायला मिळाली.

 

Web Title :- Jayant Patil | NCP leader jayant patil taunt BJP leader devendra fadnavis over the kashmir files movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kiara Advani Oops Moment | फोटो काढत असताना हवेमुळं उडाला कियाराचा ड्रेस, सावरत असतानाच झाली Oops Moment ची शिकार

 

Sunny Leone Monokini Photo | सनी लिओनीचा मोनोकिनीमधील फोटोनं सोशल मीडियावर लावली आग; पाहा व्हायरल फोटो

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! माणिकचंद ऑक्सिरीच, एसके डॉमिनेटर्स इलेव्हन संघांचा सलग दुसरा विजय