मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये (Yashwantrao Chavan Pratishthan) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली, मंत्री, खासदार आणि काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये राजकीय परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘जातनिहाय जनगणना करणे ही राष्ट्रवादीची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी लवकरच सर्व पक्षीय बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विनंती करणार असल्याचे,’ त्यांनी सांगितले.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, “शरद पवार नेहमीच अशा बैठका घेत असतात. या बैठकांमध्ये राज्यातील प्रश्नांवर चर्चा होते. ही बैठक देखील अशीच होती. त्यामध्ये राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Elections), विधानपरिषद (Legislative Council) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर (Local Body Elections) चर्चा करण्यात आली. पक्षाच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे मंत्री जनता दरबार घेतच आहेत. त्यातून लोकांचे प्रश्न सोडवण्यात येत आहे. इतकंच नाही तर जिल्हा पातळीवर हे काम सुरू असल्याचे,” त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “राज्यसभेसाठी भाजपने (BJP) तिसरा उमेदवार दिला आहे.
त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तो घोडेबाजार भाजपला अपेक्षित नसावा अशी खात्री आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते निर्णय घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तीन पक्ष आहेत. त्यामुळे एकत्रित निवडणुका लढणार आहोत.
10 जूनला मतदान असून अजून बराच वेळ असल्याचे,” जयंत पाटील यांनी सांगितले.
Web Title :- Jayant Patil | NCP leader jayant patil will request the chief minister to hold an all party meeting to conduct a caste wise census
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update