Jayant Patil | अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटलांनी कॅबिनेटची बैठक अर्धवट सोडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जयंत पाटील यांची प्रकृती ठीक असून ते नियमित तपासणीसाठी रूग्णालयात गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रकृती बिघडली आहे. मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) सुरु असताना जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना जयंत पाटील यांना त्रास सुरु झाला.
त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रुग्णालयाकडे रवाना झाले.
त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
त्यांच्यासोबत राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), सतेज पाटील व इतर मंत्री असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे,
त्यांची तपासणी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता.
जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) दौऱ्यातही ते सोबत होते.
त्यांनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरनुकसानीची माहिती दिली होती.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जयंत पाटील यांचा मुलागा देखील त्यांच्यासोबत आहे.

दरम्यान, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील यांची प्रकृती ठीक असून ते नियमित तपासणीसाठी रूग्णालयात गेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title : Jayant Patil | ncp maharashtra president jayant patil admitted in breach candy hospital mumbai he leave cabinet meeting and went to hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

Unwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या