Jayant Patil | आघाडीला १७५ जागांवर विजय मिळणार, जयंत पाटलांचा दावा; तर कोल्हे म्हणाले, “आता आमदार कसा होतो ते …”

शिरूर : Jayant Patil | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून (Sharad Pawar NCP) ‘शिवस्वराज्य’ यात्रेचे (Shiv Swarajya Yatra) आयोजन केले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe), राज्यभर दौरा करत आहेत. आज शिरूर- हवेली मतदारसंघात (Shirur-Haveli Constituency) ही शिवस्वराज्य यात्रा पोहोचली असून तिथे जाहीर सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार कोल्हे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

अमोल कोल्हे म्हणाले, “कसा खासदार होतो याचं उत्तर लीड देऊन जनतेने दिले आता आमदार कसा होतो बोलणा-यांनाही तसंच उत्तर द्या. संभाजी महाराजांच्या स्मारकाचे सहा महिन्यापुर्वी भूमिपूजन झाले मात्र सहा महिन्यात एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. हाताला दुखापत झाली. वेदना होतात, मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शिवस्वराज्य यात्रा घेऊन जातोय, कारण शिरुर हवेलीला शरद पवार साहेबांनी शब्द दिला आहे”, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी लाल दिव्याची अपेक्षा व्यक्त केली.

जयंत पाटील म्हणाले, “पुणे जिल्ह्यात अमोल कोल्हे, अशोक पवारांनी खंबीर साथ दिली. शपथविधीला हजर असताना चुकीचा मार्ग न निवडता निष्ठा जपली. अमोल कोल्हेंना प्रचंड प्रलोभने होती. आकडे जर सांगितले तर तुम्ही म्हणाल आयुष्याचे भलं झालं असतं. अमोल कोल्हेंची किंमत मोजण्याचे प्रयत्न झाले त्यांनी ऐकलं नाही तर दम देण्याचा प्रयत्न झाला अगदी कुटुंबापर्यंत गेले”, असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत पैशाचा पाऊस पडला. ७० ते ९० कोटी खर्च केले, एकाने तर १५० कोटी खर्च केले.
ही लोकं काय व्यवसाय करत असतील? सातारा येथे एका रुग्णालयात मेलेल्या माणसावर उपचार केले हे हॉस्पिटल भाजपाच्या ताब्यात आहे. मेलेल्या माणसांना पैसे देऊन घरी पाठविल्याचे प्रकार यांनी केले
हा व्यक्ती राज्यातल्या प्रमुख नेत्याचा विश्वासू सहकारी आहे,” असे म्हणत जयंत पाटलांनी आमदार गोरेंवर जोरदार टीका केली.

“विधानसभेत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) १७५ जागांवर विजय मिळणार आहे.
महाविकास आघाडीचा नेता कोण असं विचारतात? पण महायुतीचा नेता मुख्यमंत्री कोण हे विचारा एकमत झालं की बघू.
भाजपचा कोण मुख्यमंत्री होणार आणि दोन नेत्यांना मान्य होतेय का पाहू?” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Sanjay Raut | “राज ठाकरेंची गाडी अडवणारे कार्यकर्ते आमचेच पण…” संजय राऊतांचा खुलासा

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)