Jayant Patil | पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार – जयंत पाटील 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मतदार यादी व बूथ कमिटी हे सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत (PMC Election) आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (NCP) महापौर (Mayor) होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ (Rashtrawadi Parivar Sanvad Yatra) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात (Pune City) आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा असंख्य कार्यकर्त्यांचा परिवार आहे. परिवारातील सर्व सदस्यांसोबत संवाद साधण्यासाठी ‘संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रवादी परिवार संवाद” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या संवाद यात्रेचे आज पुणे शहरात आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), महिला प्रदेशध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh), सुनील गव्हाणे (Sunil Gavhane) यांच्या प्रमुख उपस्थितीत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे वडगावशेरी (Wadgaon Sheri), हडपसर (Hadapsar), पर्वती (Parvati,), पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment) या चारही विधानसभा मतदारसंघाची (Assembly Constituency) आढावा बैठक घेण्यात आली. याअंतर्गत सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचे विशेष कौतुक केले.

 

जयंत पाटील म्हणाले, त्यांनी पुढाकार घेत नवे पक्ष कार्यालय सुरू केले, या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या 2019 च्या निवडणुकीमध्ये वडगावशेरी व हडपसर या विधानसभा मतदारसंघात आपण सर्वांनी पक्ष संघटना बूथ कमिटी यावर एकसंधपणे काम केले. त्याचा परिणाम म्हणून आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) व चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांना आपण विधानसभेत पाठवले  खडकवासला व पर्वती या दोन विधानसभा मतदासंघांत आपण तयारीत कमी पडलो तिथे थोड्याफार फरकाने आपल्या सहकार्‍यांना अपयश आले. मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर होणार याबाबत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

 

 

ज्येष्ठ नेत्यांसोबत थेट संवाद होत असणल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिवार संवाद यात्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे,
कमलनानी ढोले पाटील सर्व आजी-माजी नगरसेवक, सर्व सेल अध्यक्ष, कार्यकारणी सदस्य व
मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Jayant Patil | NCP will be the mayor in Pune Municipal Corporation election – Jayant Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | ‘बंकरखालील मुली गायब होत आहेत, आतातरी पंतप्रधानांनी जागं व्हावं’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा!

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 675 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Jayant Patil | ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुटकेबाबत विश्‍वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो’, राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर नाराजी