Jayant Patil | ‘नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले…’, जयंत पाटलांची रमेश बैस यांच्या नियुक्तीवरुन भाजपवर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागेवर रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त राज्यापालांच्या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. राज्यघटनेच्या विरोधात काम करुन घटनाबाह्य सरकारला थपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली. आता नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत याची अपेक्षा आहे, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

 

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया देताना म्हटले, महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या (Constitution) विरोधात काम करुन घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो.

नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपाच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी अशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा विजय असो असे म्हणत या महामानवांचा जयघोष केला आहे.

 

 

उशीरा का होईना न्याय मिळाला – सुप्रिया सुळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्दैवी असून,
हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले नाही.
कोणत्याही देशात किंवा राज्यात महापुरुषांचा अपमान करणे हे अयोग्य आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी तेच पाप केलं. उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला,
अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर दिली.

 

 

Web Title :- Jayant Patil | new governor will not be puppet of bjp jayant patil expressed hope on ramesh bais

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा