Jayant Patil | ‘धनंजय मुंडेंना पुढच्या 10 निवडणुका कोणी हरवू शकत नाही’ – जयंत पाटील

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज (मंगळवारी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे परळी (parali) दौ-यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेवरुन (Dhananjay Munde) प्रतिक्रिया व्यक्त करत तोंडभरून कौतुक केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांच्या असलेल्या प्रेमाबद्दल मी आजवर ऐकलं होतं. पण आज मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं, प्रत्यक्ष अनुभवलं. कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहता पुढच्या 10 निवडणुकात धनंजय मुंडे यांना कोणी हरवू शकत नाही,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते परळीत भाषणादरम्यान बोलत होते.

जयंत पाटील (Jayant Patil) याचं आज (मंगळवारी) परळीत जंगी स्वागत करण्यात आलं आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी पाहून पाटील भारवून गेले.
त्यावेळी जंयत पाटील म्हणाले, परळीत आल्यानंतर कोरोना पूर्ण गेल्याची माझी खात्री झाली.
परळी मतदारसंघातील पहिल्या गावापासून मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी माझ्या लग्नाची वरात कधी काढली नव्हती.
भविष्यात अशा वराती बऱ्याच निघणार आहेत, असं मी बायकोला म्हटलं होतं. ते आज खरं ठरलं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Pune News | दत्तवाडी परिसरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल; हंडा मोर्चा काही दिवसांसाठी मागे

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मुंडे यांच्यासारखा हिरा शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी ओळखला आणि त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पदाची संधी दिली.
मुंडे यांनी त्या भूमिकेला न्याय दिला. लहान वयात अतिशय प्रभावीपणे काम केलं.
त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे. विकासाच्या बाबतीत परळी पहिल्या ५ मध्येच नाही तर पहिल्या क्रमांकावरही येऊ शकते.
त्यासाठी धनंजय मुंडे यांच्यासारखा हिरा परळीकरांनी तळहाताच्या फोडासारखा जपायला हवा.

दरम्यान, पुढे ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक लढवय्या नेता मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडे हे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात. गोपीनाथरावानंतर या मतदारसंघाचा नावलौकिक वाढवण्याचं काम एकमेव धनंजय मुंडे हेच करू शकतात. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

Pune Police Crime Branch | ज्लेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jayant Patil | no one can defeat dhananjay munde for next 50 years says jayant patil in beed district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update