इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On BJP Govt | हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजप (BJP) मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागं उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवार यांना मोडण्याचे प्रयत्न केले. ईडीची नोटीस (ED Notice) पण पाठवली, असे म्हणत जयंत पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे. (Indapur Assembly Constituency)
जयंत पाटील म्हणाले, ” महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली? महाराजांना माणसं आजही का विसरु शकत नाहीत. महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागं उभं राहण्याची महाराष्ट्रातील माणसांची पद्धत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचे काम केले. आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवार साहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गांचा अवलंब झाला.
२०१९ च्या निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती. महाराष्ट्र मोडण्याचे काम दिल्लीत बसून काही लोकं करत आहेत. म्हणून स्वाभिमानी माणसं शरद पवारांच्या मागं उभी राहिली”, असे जयंत पाटलांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, एक काळ असा होता, २०१९ च्या सुरुवातीला आमच्यातून एक एक नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी मी महाराष्ट्रात भाषणं करत सांगायचो, अ गेला तर चालेल, ब गेला तर चालेल, क गेला तर चालेल, ड गेला तर चालेल, कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आमच्याकडे आहे.
शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद या नेतृत्त्वात आहे.
एकदा नाही तर आयुष्यात चारवेळा त्यांनी हे करुन दाखवलं आहे.
तुम्ही पुन्हा सगळे प्रवेश करत आहात, तुम्हा सगळ्यांच स्वागत करत असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.(Jayant Patil On BJP Govt)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa