Jayant Patil On Chandrakant Patil | ‘चंद्रकांतदादा हिमालयात जाणार असतील तर मीही हिमालयात जाईल’; ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील बड्या मंत्र्याचं वक्तव्य !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Chandrakant Patil | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North By Election Result 2022) काँग्रेसच्या (Congress) नेत्या जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी विजय मिळवला आहे. भाजप (BJP) नेते सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीअगोदर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक आव्हान दिलं होतं. जर कोल्हापूर जिल्ह्यातील पोटनिवडणुक हरलो तर राजकारण सोडून हिमालयात (Himalaya) जाईल, असं पाटील म्हणाले होते. मात्र आता भाजपचा पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीतील नेते पाटलांवर निशाणा साधत आहेत. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पाटलांची खिल्ली उडवली आहे.

 

चंद्रकांत पाटील यांना हाही मतदारसंघ सोडावा लागेल असं दिसतंय. चंद्रकांत पाटील यांनी खरोखरच हिमालयात जावं. मी त्यांच्याबरोबर जाऊन येईल. चंद्रकांत पाटलांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर मीही जाईन. माझी देखील हिमालयात जाण्याची इच्छा असल्याचं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

जयंत पाटील पुण्यात (Pune) आले असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धुळ्यातील दंगलीवरही भाष्य केलं. धुळ्यात जी दंगल झाली ती मुद्दाम झाली. महाविकास आघाडी आमदार आणि पक्ष फोडण्याचं काम झालं. आता दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचं काम सुरु आहे पण आम्ही खंबीर आहोत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, ज्याला वाटत असेल त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा.
पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात (Himalaya) जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

 

 

 

Web Title :- Jayant Patil On Chandrakant Patil | jayant patil comment on chandrakant patil statement of himalaya after defeat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा