Jayant Patil On Maharashtra Govt | ‘महाराष्ट्र सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमीच’ – जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil On Maharashtra Govt | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न नव्याने तापला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर आगपाखड करत आहेत. त्यात आता एकीकडे महाराष्ट्राच्या सीमाभागावर (Maharashtra Karnataka Border Issue) आणि वाहनांवर हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय देत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Govt) समाचार घेतला आहे. (Jayant Patil On Maharashtra Govt)

महाराष्ट्र सरकार सीमाभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. यामुळे जनतेत मोठी संतापाची लाट आहे. त्यामुळेच यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने 17 डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात वाद सुरू आहेत. तिथले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आपल्या राज्याबद्दल चुकीची भाषा काढतात, इतकेच नाही, तर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. मराठी माणसांवर अन्याय केला जात आहे. अशामध्ये राज्य सरकारमार्फत कर्नाटकच्या बँकेला व्यवसाय दिले जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वाभिमान गहाण ठेवून काम करत असतील, तर ते दुर्दैवी आहे. सरकारच्या विद्वत्तेचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil On Maharashtra Govt)

कर्नाटक सीमाप्रश्नावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar)
म्हणाले, राज्य सरकारने आता नरमाईची भूमिका घेऊ नये. ‘आरे ला कारे’ केले पाहिजे.
शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीदेखील चालू प्रकार थांबवले नाहीत,
तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे म्हटले आहे.
त्यामुळे आगामी काळात जर कर्नाटकच्या कुरापती थांबल्या नाहीत, तर महाराष्ट्रातील नेतेमंडळी कर्नाटकात दाखल होतील, यात शंका नाही.

Web Title :- Jayant Patil On Maharashtra Govt | sharad pawar led ncp maharashtra chief jayant patil slams maharashtra shinde fadnavis government over border dispute issues with karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

Devendra Fadnavis-Balasaheb Thorat | बाळासाहेब थोरातांसमोरच देवेंद्र फडणवीसांची भर स्टेजवर काँग्रेसच्या मोठया नेत्याला ओपन ऑफर

Sushma Andhare | ‘त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात…’; अनिल खोचरेंचा सुषमा अंधारेंना टोला