Jayant Patil After Nawab Malik Arrest | नबाव मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले – ‘2019 मध्ये माझ्यावरही…’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil After Nawab Malik Arrest | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केल्यानंतर भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. 2019 मध्ये माझ्यावरही भाजपमध्ये जाण्यासाठी दबावतंत्र (Pressure) वापरले गेले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच माझ्यावर दबावतंत्र वापरलं गेलं, तरी पण मी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या (Rashtrawadi Parivar Samvad Yatra) तिसऱ्या दिवशी करमाळा (Karmala) येथील सभेत बोलत होते. (Jayant Patil After Nawab Malik Arrest)

 

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात (Maharashtra) कधीच सुडाचे राजकारण नव्हते, परंतु सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे.
आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल. सध्या राज्यात चुकीचे वातावरण फोफावत आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कारण नसताना ईडीने अटक केली आहे.
कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडायचे यासाठी राज्यातील काही जण कार्यरत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोणताही संबंध नसताना, कोणतेही कारण नसताना, कोणतीही माहिती न देता केंद्रीय यंत्रणांना हताशी धरुन धाडसत्र, अटक सत्र राबवलं जात आहे,
हे योग्य नाही. सध्या दबावतंत्राचे राजकारण केले जात आहे.
2019 मध्ये माझ्यावरही भाजपमध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर (Modi Government) केला.
तसेच आज आपला पक्ष सत्तेत आहे.
आपणही कोणत्याही दबावाखाली न येता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांचे विचार मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

 

Web Title :- serious allegations of jayant patil on bjp modi government after arrest of nawab malik

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडे बोल्ड ड्रेसच्या नादात झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाला कॅमेरामध्ये कैद…

 

Vaani Kapoor Hot Video | वाणी कपूरनं चक्क कॅमेरा समोरचं काढलं श्रग; चाहते म्हणाले – ‘गर्मी वाढली’ ! पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Wipro PARI Signs An MoU With COEP | अद्ययावत उत्पादन आणि ऑटोमेशन तंत्रज्ञान केंद्र स्थापनकरण्यासाठी विप्रो पारीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोबत सामंजस्य करार