Jayant Patil On Pune Drug Case | पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची जयंत पाटलांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On Pune Drug Case | पुण्यातील एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज (L3 – Liquid Leisure Lounge) या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Car Accident) पुणे पोलिसांनी (Pune Police) पब आणि बार वर कारवाई केली होती (Pubs In Pune). मात्र त्यानंतरही पुण्यात सर्रासपणे ड्रग्स ची विक्री होताना दिसत आहे. (Kalyani Nagar Car Accident Pune)

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department Pune) आणि पोलिसांच्या कारवाईला आणि कार्यपद्धतीला घेऊन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून जयंत पाटील यांनी पुणे हे ड्रग्स आणि पब चे माहेरघर असल्याचे म्हंटले आहे. जयंत पाटील यांनी एक्स सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

“गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे.

अगरवाल पोर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे.

लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.

पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन हे शहर आज सत्ताधारी भाजपा शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत आहे “, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’;
अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)